Friday, June 26

license camps : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिरांचे आयोजन

नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ (Learner) व पक्के (Permanent) वाहनचालक अनुज्ञप्ती देण्यासाठी जानेवारी ते जून 2026 या कालावधीत तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट संबंधित महिन्याच्या सुरुवातीच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी संबंधित शिबिर कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी केले आहे.

तालुकानिहाय शिबिरांचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे :
कंधार: 2 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 4 मे, 3 जून 2026
धर्माबाद: 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 6 मार्च, 6 एप्रिल, 6 मे, 5 जून 2026
किनवट: 9 जानेवारी, 9 फेब्रुवारी, 9 मार्च, 9 एप्रिल, 11 मे, 10 जून 2026
मुदखेड: 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च, 13 एप्रिल, 13 मे, 12 जून 2026
माहूर: 16 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 16 मार्च, 15 एप्रिल, 15 मे, 15 जून 2026
हदगाव: 19 जानेवारी, 18 फेब्रुवारी, 18 मार्च, 17 एप्रिल, 18 मे, 18 जून 2026
धर्माबाद: 23 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 23 मार्च, 23 एप्रिल, 22 मे, 22 जून 2026
हिमायतनगर: 28 जानेवारी, 25 फेब्रुवारी, 27 मार्च, 27 एप्रिल, 26 मे, 25 जून 2026
किनवट: 30 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 30 मार्च, 29 एप्रिल, 29 मे, 29 जून 2026

शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, स्थानिक सुटी जाहीर झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास शिबिराच्या तारखेत बदल होऊ शकतो, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!