Friday, June 26

Suresh Ghorband : राष्ट्रीय मराठा पार्टीच्या नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी सुरेश घोरबांड यांची निवड

नांदेड l कलंबर खुर्दा, ता. लोहा येथील भूमिपुत्र व समाजातील उत्तुंग नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुरेश घोरबांड यांची राष्ट्रीय मराठा पार्टीच्या नांदेड शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी जाहीर केले आहे.

सुरेश घोरबांड हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेत असून समाजातील तरुणांना संघटित व जागरूक करण्यासाठी त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. नांदेड जिल्ह्यात त्यांचा व्यापक जनसंपर्क असून सामाजिक, शैक्षणिक व संघटनात्मक क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव होनाळीकर यांनी नांदेड शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, विशेषतः आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रीय मराठा पार्टीने सक्रिय सहभाग घ्यावा व भगवा झेंडा फडकवावा, असे मार्गदर्शन केले आहे. पक्षाच्या ध्येय- धोरणानुसार व घटनेनुसार कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी सुरेश घोरबांड यांचे अभिनंदन करून, “आई तुळजाभवानी त्यांच्या कार्याला यश देवो,” अशा शुभेच्छा दिल्या आहेत. या नियुक्तीमुळे नांदेड शहरात राष्ट्रीय मराठा पार्टीची संघटनात्मक ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!