Homeक्राईमTahsildar Action : तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर...

Tahsildar Action : तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर सह मुरूम चोरी करणारा हायवा पकडला

श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| माहूर तालुक्यातील नदीपत्रावरील पाचही वाळूघाट लिलावात बोली बोलून महसूल न भरल्याने पुन्हा लीलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने माहूर तालुक्यात वाळूचा तुटवडा जाणवत असल्याचा फायदा घेऊन काही वाळू तस्कर नाल्यातून वाळू चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती तहसीलदार अभिजीत जगताप यांना मिळाल्याने त्यांनी दि 8 रोजी अर्ध्या रात्री नायब तहसीलदार कैलास जेठे सपोउपनि संदीप अन्येबोईनवाड यांचे सह कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथकाद्वारे एक ट्रॅक्टर वाळू भरून जात असताना पकडला. तर दुसऱ्या घटनेत नाल्यावर ट्रॉली लावून वाळू भरत असेल असलेली ट्रॉली जप्त करण्यात आली असून दि 9 रोजी विनापरवानगी मुरमाची वाहतूक करणारा हयवा पकडल्याची घटना घडल्याने वाळू तस्करासह इतर गौण खनिजाची चोरी करणाऱ्यात घबराट पसरली आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहाय्यक जिल्हाधिकार जेनीत चंद्रा दोन्तूला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी महसूल आणि पोलिसांचे संयुक्त पथक स्थापन करून पैनगंगा नदी पात्रावरील सर्व घाटावर करडी नजर ठेवली आहे.

IMG 20251210 WA0003 Tahsildar Action : तहसीलदार अभिजीत जगताप यांनी वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर सह मुरूम चोरी करणारा हायवा पकडला

त्यामुळे वाळू तस्करी पूर्णपणे बंद असून काही वाळू तस्कर नाल्यातील वाळू तस्करी करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळत असल्याने तहसीलदार अभिजीत जगताप नायब तहसीलदार कैलास जेठे हे स्वत दि 8 रोजी रात्री अकरा वाजता गस्तीवर असताना अंजनखेड ते रूपानाईक तांडा या रस्त्यावर पथकास सोनालीका ट्रॅक्टर मध्ये वाळू भरून जात असताना दिसल्याने त्यास अडविले. यावेळी चालक ट्रॅक्टर थांबवू न पसार झाला.

त्या ट्रॅक्टरला माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले तर दुसऱ्या घटनेत अंजनखेड ते नाईकवाडी रस्त्यावरील नाल्यावर एका ट्रॉलीत मजूर वाळू भरत असलेले दिसल्याने तेथे वाहन थांबून बघितले असता मजुरांनी पोबारा केला. तर दुसऱ्या ट्रॅक्टरचे मुंडके लावून सदरील ट्रॉली माहूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आली तर तिसऱ्या घटनेत दि 9 रोजी पालाईगुडा फाटा येथे विनापरवानगी मुरमाची वाहतूक करत असलेला एसडी कंट्रक्शन कंपनी माहूर असे लिहिलेला हायवा क्रमांक MH 26CE 1771 या हायवाची चौकशी केली. त्याचेजवळ कुठलीही परवानगी नसल्याने त्या हवालाही माहूरच्या तहसील कार्यालयात आणून जमा करण्यात आले आहे.

सदरील धाडसी कारवाई जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहायक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोन्तूला उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित जगताप, नायब तहसीलदार कैलास जेठे सपोउपनी संदीप अन्येबोईनवाड पोका ज्ञानेश्वर खंदाडे महसूल सहाय्यक मनोहर चेके, सुनील वणवे, डी वाई एरडलावार सी पी बाबर, सुमित नैताम ग्राम महसूल अधिकारी बंडू चिरंगे, लक्ष्मण मेश्राम सुमित नैताम, प्रदीप कदम सर्व ग्राम महसूल अधिकारी, विवेक नागपुरे, पवन पाटील यांचे सह या कारवाईत सर्व महसूल अधिकारी कर्मचारी कोतवाल उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments