हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे स्टार प्रचारक व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भव्य जाहीर सभा शुक्रवारी आयोजित करण्यात आली आहे.


ही सभा दि. २८ रोजी दुपारी २.३० वाजता श्री परमेश्वर मंदिर बसस्टँड परिसरात संपन्न होणार आहे. या सभेला मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्टार प्रचारक, माजी खासदार व विधानपरिषद सदस्य हेमंतभाऊ पाटील, माजी खासदार सुभाषराव वानखेडे, हदगाव-हिमायतनगरचे लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय वळसे पाटील व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रामभाऊ ठाकरे यांनी केले आहे.



