HomeनांदेडDigambar Kale : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक 2025 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दिगंबर...

Digambar Kale : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक 2025 : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून दिगंबर काळे नगराध्यक्षपदासाठी रिंगणात

हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) यांनी आपल्या अधिकृत उमेदवार दिगंबर देवराव काळे यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदासाठी मैदानात उतरवीला आहे. पक्षाच्या ‘विळा–हातोडा–तारा’ या निवडणूक चिन्हावर ते जनतेचा कौल मागत असून, त्याच्यामुळे चौरंगी लढतीत असलेल्या प्रमुख पक्षच्या उमेदवारांचे भविष्य अधांतरी आले आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हिमायतनगरमधील कामगार, शेतकरी, शेतमजूर, कंत्राटी कर्मचारी, महिला, विद्यार्थी तसेच अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने लढा दिल्याचा दावा करत काळे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

दिगंबर काळे यांनी स्थानिक प्रश्नांवर लढा दिला असून, यात पाणीटंचाई, वीज समस्या, मनरेगा प्रकल्पातील अनियमितता, बांधकाम व सफाई कामगारांचे प्रश्न, तसेच शेतकऱ्यांच्या आंदोलनांत सक्रिय भूमिका निभावल्याचा पक्षाने उल्लेख केला. लोकविकास संघर्ष समिती व पक्षाच्या वतीने त्यांनी अनेक वेळा प्रशासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धडक देत लोकहिताचे प्रश्न मार्गी लावले आहेत.

त्यांनी नांदेड न्यूज लाइव्हला दिलेल्या मुलाखतीतून नगरपंचायत कारभारावर टीका केली असून, हिमायतनगरला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर सध्याचे सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांनी गुत्तेदारीच्या आधारावर टक्केवारी संस्कृती वाढविली असल्याचा आरोप केला आहे. नियोजनशून्य कारभारामुळे शहराचा विकास खुंटल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. 19 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील विलंबही त्यांच्या टीकेचे केंद्रबिंदू ठरला.

दिगंबर काळे यांनी निवडून आल्यास घेतलेली प्रमुख वचने पुढील प्रमाणे आहेत. यात मजूर व शेतकरी वर्गासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार हमीची कामे उपलब्ध करणे, 19 कोटींची अर्धवट पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, गावठाणातील 125 अतिक्रमित घरधारकांना मालकीहक्क मिळवून देणे, फुलेनगर झोपडपट्टी व गणेशवाडीतील घरमालकी प्रश्न मार्गी लावणे, सफाई कामगारांच्या स्थायी–अस्थायी प्रश्नांचे निराकरण, महिला बचत गटांना आर्थिक बळ देणे, निराधार, ज्येष्ठ, दिव्यांग नागरिकांच्या योजनांत वाढ, अंगणवाडी, पोषण आहार, शालेय सुविधा, नवीन आपला दवाखाना उभारणी, शहरात उद्याने, सार्वजनिक शौचालये, तसेच प्राणी कोंडवाडा उभारणी, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण व स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा,सर्वांगीण, हरित व स्वच्छ हिमायतनगर घडविण्याचे आश्वासन प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देत जनतेला साकडे घातले आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, लोकविकास संघर्ष समिती व महात्मा फुले विचार मंच यांनी संयुक्तरित्या काळे यांच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments