Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या
  • Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा
  • Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय
  • Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले
  • Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना
  • The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल
  • Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रा अंतिम टप्प्यात; आकाश पाळणे-सुनामीत नागरिकांची झुंबड
  • welcome Holi-Rangpanchami : होळी–रंगपंचमीच्या स्वागतासाठी बाजार सजला; यात्रेत रंग, पिचकारी व गोडधोडाची रेलचेल
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?
नांदेड राजकीय लेख October 31, 2025

Who should activists fight for? कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी?

NNL TeamBy NNL TeamOctober 31, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता “बौद्धिक क्षमता, विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी” या संकल्पना आता कालबाह्य होत चालल्या आहेत. एकेकाळी पक्षासाठी आयुष्य घालवणारा, गावोगावी जनतेच्या समस्या सोडवणारा आणि आपल्या विचारांवर ठाम राहणारा कार्यकर्ता आजच्या व्यवस्थेत अप्रासंगिक ठरत आहे. निवडणुकीच्या मैदानात आता विचार, प्रामाणिकपणा किंवा जनसेवा नव्हे—तर पैसा, थाट, लवाजमा आणि गुंडगिरी या गोष्टीच राजकारणाचे नवे मापदंड बनले आहेत.

आज कार्यकर्त्यांचा वापर फक्त संख्याबळ वाढवण्यासाठी, सभांमध्ये घोषणाबाजी करण्यासाठी आणि नेत्याचे गुणगान गाण्यासाठीच मर्यादित राहिला आहे. प्रचार-प्रसार ही गोष्ट आता “इव्हेंट मॅनेजमेंट”च्या बाजारपेठेत गेलेली आहे. जनतेला आकर्षित करण्यासाठी गर्दी भाड्याने आणणारे लोक, भाषणांना टाळ्या पिटण्यासाठी तयार असलेले समूह — हे सर्व पैशावर उपलब्ध आहे.

या सर्व बदलांच्या पार्श्वभूमीवर, खऱ्या अर्थाने काम करणारा आणि समाजातील प्रश्नांवर बोलणारा तळागाळातील कार्यकर्ता मात्र मागे पडतो. त्याच्याकडे बुद्धिमत्ता, सामाजिक दृष्टी, आणि आपल्या विभागाच्या समस्या सभागृहात मांडण्याची प्रामाणिक इच्छा असते, पण आजच्या ‘नव्या’ राजकीय यंत्रणेत त्याला संधी मिळणे कठीण झाले आहे.

याला केवळ व्यवस्था नव्हे, तर मतदारांची मानसिकताही तितकीच जबाबदार आहे. आज मतदार एखाद्या साध्या, मेहनती कार्यकर्त्याला नाकारतो आणि एखाद्या निष्क्रिय, पण थाटात असलेल्या उमेदवाराला पसंती देतो. एखाद्याकडे गाडी, पैसे आणि लोकांना प्रभावित करणारा देखावा असेल तर तोच जिंकतो, जरी त्याच्याकडे समाजासाठी काहीही करण्याची दृष्टी नसेल.

त्यातही अनेक वेळा कार्यकर्त्यांचा वापर करून घेणारे धनाढ्य उमेदवार त्यांना नंतर बाजूला करतात. काही वेळा तर त्यांच्या राजकीय आयुष्यालाच कटकारस्थान करून संपवले जाते. त्यामुळे समाजहितासाठी लढणारे प्रामाणिक कार्यकर्ते हतबल होतात आणि राजकारणात प्रवेश करण्याचे स्वप्नही सोडून देतात.

परिणामी, सभागृहात पोहोचणारे प्रतिनिधी बौद्धिक आणि नैतिक दृष्ट्या कमकुवत असल्यामुळे शहरांच्या विकासाचा आलेख खालावत आहे. नगरपरिषद, महानगरपालिका परिसरात कोटींच्या गाड्या थाटात उभ्या असतात, पण नागरिकांच्या मूलभूत समस्या तशाच कायम राहतात.

मतदार दारू, पैसे आणि तात्पुरत्या सुविधा यांच्या मोहात पडत असल्याने, पैशानेच निवडणूक जिंकता येते हे सर्वच पक्षांनी कबूल केले आहे. पक्षनिष्ठा, विचारसरणी हे सर्व दुय्यम ठरले आहे. पैसा आणि प्रभावाच्या जोरावर पक्ष बदलूनही यश मिळवता येते, अशी प्रवृत्ती दृढ होत चालली आहे.

हे चित्र लोकशाहीसाठी घातक आहे. पण दुर्दैवाने कोणताही पक्ष या दिशेने चिंतन करताना दिसत नाही. उमेदवारी देताना प्रामाणिकता, बुद्धिमत्ता आणि कामगिरी बाजूला ठेवून केवळ पैशाची ताकद मोजली जाते.

यामुळे आगामी काळात खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवणे हे “स्वप्नच” ठरणार आहे. मग प्रश्न असा उरतो — कार्यकर्त्यांनी लढायचे कोणासाठी? आणि कोणत्या लोकशाहीसाठी?

लेखक –गोविंद मुंडकर

Who should activists fight for?
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimaytnagar news : माहूर-किनवट दौऱ्यानिमित्त भाजप नेत्यांचा हिमायतनगरात सन्मान
Next Article Aaple sarkar seva : ‘आपले सरकार सेवा केंद्र’ समन्वयकांचे मानधन थकले; नोव्हेंबरपासून पुण्यात आंदोलनाचा इशारा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

Holi Special : होळी स्पेशल! आज २६ वे महामूर्ख कवी संमेलन; द्विअर्थी कव्वालीचा जंगी सामना

The thrill of wrestling : हिमायतनगरच्या श्री परमेश्वर यात्रेत मानाच्या कुस्तीचा थरार; विक्रम गायकवाड अव्वल

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mp vasantrao chavan ; खा. वसंतराव चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार -NNL

August 27, 2024

A gold-plated wall : इतिहासाच्या भिंतीवर फुलांचा सुवास… पाटणूर ‘आपरंपार’ गडावर सोनचाफ्याची भिंत!

July 26, 2025

Citizens in the low-lying areas of Vishnupuri Dam should be careful | विष्णूपुरी बंधाऱ्याच्या सखल भागातील नागरिकांनी सावध असावे : जिल्हाधिकारी – NNL

July 25, 2024

CIDCO ; वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रता मेळाव्यात सिडकोतील उत्कृष्ट वृत्तपत्र विक्रेते म्हणून बालाजी सुताडे यांच्या सन्मान चिन्ह देऊन सत्कार

October 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Festivals : चातुर्मासातील सण, व्रते आणि उत्सव

हेलन केलर: अंधार आणि शांततेच्या पलीकडे – NNL

Teacher died ; सागवी उमर येथील शिक्षक ढगफुटी झालेल्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने झाले मयत -NNL

Dilip Gawde : विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील लाभार्थ्यांशी संवाद

Invention of folk culture Malegaon Yatra : लोकसंस्कृतीचा आविष्कार माळेगाव यात्रा -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Holi-Rangpanchami : प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या

March 2, 2026

Animal Husbandry Department : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

March 2, 2026

Victory for farmers : लेखी आश्वासनानंतर सातव्या दिवशी उपोषण मागे; शेतकऱ्यांचा तात्पुरता विजय

March 2, 2026

Passenger Saftey : आरपीएफ नांदेड विभागाची प्रवासी सुरक्षेसाठी कडक पावले

March 2, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?