HomeनांदेडReservations for the post of Mayor : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण...

Reservations for the post of Mayor : हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन — दिवाळीनंतर निवडणुकीचा बिगुल वाजणार!

मुंबई, नांदेड, हिमायतनगर, अनिल मादसवार | राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मंत्रालयात नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली. या सोडतीत हिमायतनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ( Reservations for the post of Mayor) ओपन (खुल्या प्रवर्गासाठी) घोषित करण्यात आले आहे.

आरक्षणाची घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी तयारीला सुरुवात केली आहे. दिवाळीनंतरच निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हिमायतनगर नगरपंचायतीची पहिली निवडणूक १० जानेवारी २०१६ रोजी पार पडली होती. त्या वेळी काँग्रेसने नगरपंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली होती. पुढील काळात नगराध्यक्ष पदावरून मोठ्या राजकीय हालचाली आणि बंडखोरी झाल्याने सत्तेत बदल झाला आणि शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडला गेला. मात्र २४ जानेवारी २०२१ रोजी नगरपंचायतीचा कार्यकाळ संपल्यापासून प्रशासक राज सुरू आहे.

प्रशासकांच्या काळात नागरिकांच्या अनेक समस्या ऐरणीवर आल्या आहेत. शहरात स्वच्छतेचा अभाव, अतिक्रमण, पाणीपुरवठा, रस्ते व ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांवर नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगराध्यक्ष नसल्याने शहर विकासाची गाडी रुळावरून उतरल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, दोन वेळा आरक्षण जाहीर होऊनही निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारी अखेरपर्यंत निवडणुका पार पाडण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने तयारी गतीने सुरू केली आहे.

आज मंत्रालयातून जाहीर झालेल्या सोडतीनुसार, हिमायतनगर नगराध्यक्ष पद ओपन प्रवर्गासाठी राखीव असल्याने या पदासाठी महिला व पुरुष दोघांनाही संधी उपलब्ध झाली आहे. आता सर्वांच्या नजरा दिवाळीनंतर होऊ शकणाऱ्या निवडणुकीकडे लागल्या असून, शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments