Homeनांदेडमहाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर -NNL

महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची कार्यकारिणी जाहीर -NNL

हिमायतनगर। म.रा.कृ.प.तां.ग्रा.से. संघटणा राज्यस्तरावर सर्व सामान्य ग्रामसेवकांचे वेतनत्रुटी सेवा जेष्ठतेसाठी कंंत्राटी काळ धरणे २०१७ नंतर आदर्श पुरस्कार भेटलेल्यांना वेतनवाढ देणे बदली प्रक्रीया आॅनलाईन, ग्रामसेवकांच्या कामकाजाचा ताण कमी करणे ईत्यादी कामामुळे प्रभावित होऊन आणि राज्याध्यक्ष – नितिन धामणे व राज्यसचिव – हरिश्चंद्र काळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात शाखा सुरू करून तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी शिलेवाड करेन्ना नारायण यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची हिमायतनगर तालुका कार्यकारिणी बुधवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे.पंचायत समिती सभागृहात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सदरील कार्यकारीणी जाहिर करण्यात आली आहे.सर्व ग्रामसेवक संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष म्हणून शिलेवाड करेन्ना नारायण यांची निवड करण्यात आली तर सचिवपदी – शिंदे गजानन देवबा ,कार्याध्यक्ष- मारोती कोंडामंगल,कोषाध्यक्ष-नारायण काळे,संघटक- व्हि.जी.जक्कीलवाड,उपाध्यक्ष- केशव सुर्यवंशी सहसचिव- आशिष देशमुख,सहकार्याध्यक्ष- पवन जाधव याप्रमाणे निवड करण्यात आली.

या बैठकीत हिमायतनगर तालुक्यातील 25 पैकी 16 ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते .या निवडीसाठी राज्यकार्याध्यक्ष – मधुकर मुंगल, विभागिय उपाध्यक्ष- सुनिल पारडे,जेष्ठ मार्गदर्शक – अनुप श्रीवास्तव सहसचिव – प्रभाकर सोगे,उपाध्यक्ष – प्रशांत कोकाटे, उपाध्यक्ष – मोहन राहुलवाड, भोकर तालुका सचिव – बालाजी कनोजवार, ,भोकर तालुका कार्याध्यक्ष -संतोष सितावार (भोकर) जिल्हाध्यक्ष-गुलाब वडजे यांच्या सह सदस्य उपस्थित होते.सर्व नविन निवड झालेल्या पदाधिकार्‍यांचे राज्य कार्यकारीणी व जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments