HomeनांदेडYoung Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या...

Young Man killed by Lightening : सावळेश्वरला वीज कोसळून तरुण ठार: मयताच्या नातेवाईकांचे आ. चिखलीकरांकडून सांत्वन

उस्माननगर ( माणिक भिसे ) नांदेड जिल्ह्यात वीजेचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथे वीज कोसळून एक तरुण शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली.

घटनेचे वृत्त समजताच आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. कंधार तालुक्यातील सावळेश्वर येथील तरुण शेतकरी पांडुरंग निवृत्ती कदम वय ४७ वर्षे हा शेताकडे गेला होता. सायंकाळी विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शेतातून घरी येत असताना गावाजवळील डांबरी रस्त्यावर पांडुरंग कदम यांच्या अंगावर वीज कोसळली ते जागीच ठार झाले.

कंधार विधानसभा मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर हे पुरग्रस्त भागाचा दौरा आटोपून चिखली येथील आपल्या मळ्यात दाखल झाले होते. घटनास्थळ त्यांच्या मळ्यापासून हाकेच्या अंतरावर असल्याने ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पांडुरंग कदम हा जागीच ठार झाले होते. सावळेश्वर येथील मयताच्या निवासस्थानी जाऊन नातेवाईकांचे सांत्वन करुन कदम कुटूंबियांना धीर दिला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments