HomeनांदेडNanded ; नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

Nanded ; नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

नांदेड l जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस व अतिवृष्टी झाल्याने काही गावात पूरस्थिती निर्माण झाली असता मदत व बचाव करण्यासाठी भारतीय सैन्य दलास पाचारण करण्यात आले होते. बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले.

मुखेड तालुक्यातील 17 व 18 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस व अनेक मंडळात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे हसनाळ, रावणगाव,भासवाडी व भिंगोली या गावात पूरस्थिती निर्माण होऊन ग्रामस्थ अडकून पडले होते.

IMG 20250820 WA0008 1 Nanded ; नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

सुरुवातीला राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने पहाटे बचाव कार्यास सुरूवात केली. तथापि पूर बाधितांची संख्या जास्त असल्याने तसेच कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सैन्य दलास पाचारण केले होते. दिनांक 18 रोजी सायंकाळी पुणे येथील 269 इंजिनिअर रेजिमेंट व छत्रपती संभाजीनगर येथील 321 मेडियम रेजिमेंट यांनी मदत व बचाव कार्यात सहकार्य केले.

IMG 20250820 WA0007 Nanded ; नांदेडच्या नैसर्गिक आपत्तीत सैन्य दलाची मदत ; जिल्हाधिकाऱ्यांनी मानले आभार

या तुकड्यांनी 43 कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. तसेच 650 नागरिकांना भोजन तसेच 200 लोकांना आरोग्य शिबिरातून सेवा दिली.त्यामुळे आणखी मोठी हानी टाळणे शक्य झाले. आपत्तीचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मोठी मदत झाली. बुधवार दिनांक 20 रोजी सदर दोन्ही तुकड्यांना कार्यमुक्त केले.याप्रसंगी लेफ्टनंट कर्नल सागर महात्मे, मेजर सुमित चामले, कॅप्टन राणा, कॅप्टन निखिल कदम यांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आभार मानले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments