Friday, June 26

Savargaon (N.) : सावरगाव (न.) मुलाची आत्महत्या त्यानंतर वडिलांचा मृत्यू ; त्या कुटुंबियांचे आ चिखलीकरांकडून सांत्वन

लोहा| मागील दहा दिवसांपूर्वी लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव येथे नापिकी व कर्ज बाजारीपणामुळे शेतकरी माधव बेंद्रे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली त्यानंतर त्याच्या वडिलांचा हृदयविकाराच्या आजाराने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना घडली.त्या बेंद्रे कुटुंबियांची आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घरी जाऊन भेट घेतली .सांत्वन केले व धीर दिला.

मागील दहा -बारा दिवस पूर्वी नसरत सावरगाव येथे मुलगा व वडील याचा निधनाची घटना हृदय हेलावून टाकणारी घडली. त्यातच आई ही सुद्धा रुग्णालयात उपचार घेत होती.बेंद्रे कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले. पिता पुत्राच्या निधनानंतर श्रीमती शोभाबाई भिमराव बेद्रे यांची आ प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट घेतली त्याना धीर दिला त्याच्या कुटुंबाला सर्वोत्तरी मदत करायचे आश्वासित केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रवीण पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार माजी उपनगराध्यक्ष ,केशवराव मुकदम, तालुकाध्यक्ष मनोहर पाटील भोसीकर,माजी नगराध्यक्ष स्वप्निल पाटील लुंगारे, माजी उपसभापती बालाजी पाटील कदम, भारत पाटील कदम, सरपंच संपती भावे,उपसरपंच पाडूरंग पाटील देवकते,नायब तहसीलदार अशोक मोकले ,विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे , भगवान राठोड विस्तार अधिकारी म्हेत्रे ,ग्रामसेवक संभाजी हळदेवाड ,सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गुडपे साहेब,तलाठी भूमेश्वर विभुते ,बेंद्रे, कारामंगे, बंडू वडजे,अविनाश पाटील सुर्यवंशी,भास्कर पवार,बाळू पवार,भानुदास पाटील यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!