HomeनांदेडChief Minister : मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत

Chief Minister : मुख्यमंत्री 100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत

नांदेड| तहसील कार्यालय नांदेड येथे मुख्यमंत्री शंभर दिवस शासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रशासनामध्ये प्रभावीपणे वापर कसा करावा व कार्यालयीन काम सुकर करून जनतेची अधिकाधिक सेवा कशी करावी याबाबत सर्व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना आपली ऑनलाइन फसवणूक होऊ नये यासाठी “Stay Safe Online / Cyber Hygiene” सायबर सुरक्षा जनजागृती आणि प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी MyGov Campus Ambassador तथा महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी संजय वारकड यांच्या हस्ते झाले. मास्टर ट्रेनर दीपक सलगर यांनी सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, डेटा सुरक्षा, ऑनलाईन फसवणूक आणि डिजिटल व्यवहारांसाठी आवश्यक उपाययोजनांवर महत्त्वपूर्ण माहिती दिली.

कार्यशाळेत Wi-Fi Security, Online Security, ATM Security, SIM Cloning, Aadhaar Payment Security, Cyber Bullying Protection यासारख्या विषयांवर सखोल चर्चा झाली.

तहसील कार्यालय नांदेड आता सायबर सिक्युरिटी अवेअर आणि सायबर हायजिन प्रमाणित कार्यालय बनले असून, हा उपक्रम सरकारी कार्यालयांसाठी आदर्श ठरेल. या प्रशिक्षणास स्वप्निल दिगलवार, काशिनाथ डांगे, इंद्रजीत गरुड, रवींद्र राठोड सर्व नायब तहसीलदार, देविदास जाधव इत्यादी सह सर्व कर्मचारी हजर होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments