HomeनांदेडTribute to former professor : माजी प्राध्यापक कॉ.जी.एन.साईबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर...

Tribute to former professor : माजी प्राध्यापक कॉ.जी.एन.साईबाबा यांना जिल्हाधिकारी कार्यालया समोर आदरांजली -NNL

नांदेड| खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आलेले आणि ९० टक्के दिव्यांग असलेले तसेच गुन्हा केला नसतानाही दहा वर्षे नागपूर स्थीत केंद्रीय कारागृहात अंडा सेल मध्ये जेल भोगलेले मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड जी.एन.साईबाबा यांना दि.१५ ऑक्टोबर रोजी इंडिया व डाव्या आघाडीच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.

साईबाबा यांचे १२ ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथे दुःखद निधन झाले असून ते दिल्ली येथील विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अद्यापनाचे कार्य करीत होते. त्यांच्यावर माओवादी म्हणून गडचिरोली येथील न्यायालयाने साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु मुंबई उच्च न्यायाल्याने ती शिक्षा रद्द करून साईबाबा शिक्षेतून यांना निर्दोष मुक्त केले होते. त्यांच्या दुःखद निधनामुळे डाव्या चळवळी मध्ये दुःख व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु असलेल्या पीआरओ आणि पूरग्रस्तांच्या आंदोलन स्थळी त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी माकप सचिव तथा सीटूचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड, सीटू राज्य कमिटी सदस्या कॉ.करवंदा गायकवाड, अ. भा. जमसंच्या तालुका अध्यक्षा कॉ. लता गायकवाड, डीवायएफचे तालुका निमंत्रक कॉ.जयराज गायकवाड, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. पिराजी गायकवाड, भारती राष्ट्रीय काँग्रेसच्या अल्प संख्यांक विभागाचे राज्य सरचिटणीस नवनीत सिहं गांधी, उपोषणार्थी संभाजी सावते, माजी नगरसेविका शोभा गिरबीडे, सुभाष लोणे, रंजना सोनकांबळे, क्षमा वाघमारे, कॉ. बालाजी हिंगोले,चंद्रकांत फुगारे,आदींची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments