हिमायतनगर। येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संशेची वार्षिक सर्वसाधारण सभा शांतेत व नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नूतन इमारतिचा लोकार्पण सोहळा हिंगोलीचे खा. नागेश पाटील आष्टीकर व आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते दिनांक ३० सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात संस्थेचं सभासद व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित झाले होते.
याप्रसगी नांदेडचे साखर संचालक विश्वास देशमुख, परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, ज्ञानेश्वर कात्रे, गंगाधर सावकार मामिडवार, सोसायटीचे चेयरमन प्रवीण शिंदे, सोसायटी संचालक उदय देशपांडे, प्रभाकर मुधोळकर, बाळासाहेब चवरे, संदीप तुप्तेवार, दतराव कदम, अनंतराव देवकते, विठ्ठल ताडेवाड, उत्तमराव ढोले, सुभाष शिंदे , मोतीराम राऊत, यांच्यासह काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी कृउबा संचालक शेख रफिक सेठ, मदनराव पाटील, शंकर वानखेडे, संतोष गाजेवार, सखाराम देवकते, सरदार खान, ज्ञानेश्वर शिंदे, यांच्यासह चेअरमन, शेतकरी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरसंचालन व उपस्थितांचे आभार सचिव के. डी. गव्हाणे यांनी केले.