HomeनांदेडToday's e-publication of the neglected father man ;चळवळीतला उपेक्षित बाप माणूस ग्रंथाचे...

Today’s e-publication of the neglected father man ;चळवळीतला उपेक्षित बाप माणूस ग्रंथाचे आज ई प्रकाशन – NNL

नांदेड l मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने विविध उपक्रम पंधरवड्यातील कार्यक्रमांपैकी एक “चळवळीतला उपेक्षित बाप माणूस” या विविध लढ्याच्या चळवळीतील योद्धाच्या सन्मानार्थ त्यांच्या कार्यावर आधारित लेख संग्रहातील संपादित ग्रंथाचे ई प्रकाशन दि.१७ सप्टेंबर रोजी करण्याचे आयोजन केले आहे.

“चळवळीतला उपेक्षित बाप माणूस” या ग्रंथाचे ई प्रकाशन राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश जिल्हा शाखा आनंद नगर येथील संपर्क कार्यालयातुन होत आहे.याप्रसंगी परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष मधुसूदनजी कुलथे, माजी कुलगुरू उद्धव भोसले, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार बालाजीराव कल्याणकर,राजेश पावडे,गोविंद मुंडकर,डॉ. शिवदास हमंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.१७सप्टेंबर २०२४ रोज मंगळवार दुपारी साडेबारा वाजता संपन्न होत आहे.

सौ ललिता बंडे संपादित “चळवतील उपेक्षित बाप माणूस” या ग्रंथाचे ई. प्रकाशन शॉपिजन ही प्रकाशन तर्फे प्रकाशित आणि प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमास चळवळी व सारस्वत प्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन डॉक्टर शिवदास हमाद यांनी केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments