नवीन नांदेड| शहीदाचा जवानांचा परिवारातील सदस्याच्या व सेवानिवृत्त सैनिक यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेला सन्मान हा अभिमान असल्याचे सांगून सैनिक हा भारतीय सिमेवर राहुन केलेले कार्य उल्लेखनीय आहे, मनपा प्रशासनाने सैनिकाच्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी सहकार्य करावे असे आवाहन सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम,यांनी मनोगत प्रसंगी आपले व्यक्त केले.
स्वातंत्रयाच्या अमृत मोहत्सावाच्या अनुषंगाने नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड यांच्या वतीने आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने आजी माजी कार्यरत स्वातंत्र्य सैनिक व बलीदान दिलेल्या शहीदाचा परिवारातील सदस्य यांच्या सत्कार सोहळा १४ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी सहाय्यक आयुक्त रमेश चौरे, रावण सोनसळे,बेग, सेवानिवृत्त सैनिक यांच्या सह मान्यवरांच्यी उपस्थितीती होती.
यावेळी स्वातंत्रयाचा अमृत मोहत्सव कार्यक्रम अंतर्गत सेवानिवृत्त स्वातंत्र्य सैनिक गोविंद केंद्रे,एम.डी. कुलकणी दिगांबर कांबळे, लक्षमण धुळेकर, दता चोपवाड,अतंम वाघमारे, दता पोतगंते,संतोष येजगे, तुकाराम दिनकर, कमलाकर कांबळे, प्रकाश कस्तुरे,नायक अंबादास कर्डीले, एस.डी.शिवणकर, पंढरीनाथ घुगे,शिवाजी वाघमारे,गोविंद निरपतेवार,रामकिशन तेलंगे,बंडु पांचाळ,तोडचिरे आत्त्माराम आंनद पवार, सुर्यकांत खेडकर, जौधंळे विक्रम, कैलास कांबळे, बि.एस.चवरे आंनदराव देशमुख, आचमारे,बळी घंटेवाड,दता पवार, ढगे विश्वनाथ,चंदेल आर, व्ही,भासकर कांबळे,विजयानंद सोनटक्के, व्यंकटराव कळसे,बाबुराव पदके, शहीद जवान पत्नी स्वाती कामेश कदम, विठ्ठल शिवलाड यांच्या सह जवळपास चाळीस जवानाच्या मान्यवरांच्या हस्ते व सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड व कर्मचारी यांनी शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी प्रारंभी शहीद जवांनाना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली तर उपस्थितीतांना तिरंगा प्रतिज्ञा शपथ देण्यात आली.या सोहळ्याचे प्रास्ताविक कार्यालय अधिक्षक विलास गजभारे यांनी तर सुत्रसंचालन शामसुंदर आरकुले,यांनी केले, कार्यक्रम यशस्वीते साठी सिडको क्षेत्रीय कार्यालयाचे कर निरीक्षक मारोती सारंग, प्रकाश दर्शने, नागापूरकर, यांच्या सहकर्मचारी, मालु एनफळे,महेद्रं पठाडे,मिना अडबलवार, अर्चना जौधंळे, रमेश यशवंतकर नथुराम चौरे,प्रकाश लोखंडे,जयराम सुर्यवंशी, नरेद्रं शिंगे,चावरे प्रशांत मुक्ताबाई धरमेकर,यांच्या सह कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या सोहळ्यात सिडको येथील सेवानिवृत्त सैनिक विठ्ठल कदम यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कल्याण संघटक या पदावर नियुक्ती व सेवानिवृत्त सैनिक अमृत बाबुराव सर्जे यांच्यी परभणी येथे पोलीस कॉन्स्टेबल या पदावर नियुक्ती झाल्याबदल सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड व नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर व कर्मचारी यांनी सत्कार केला. मातृभूमी प्रतिष्ठान नांदेड यांच्या वतीने आत्महत्या ग्रस्त शेतकरी पाल्यांना शैक्षणिक साठी तर आजी माजी सैनिक साठी हे प्रतिष्ठान कार्यरत असल्याचे डॉ. नागेश कल्याणकर, कॉ. प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले.