Friday, June 26

Tag: Work on Himayatnagar railway station is in full swing

Work on Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम थातूरमातूर; ठेकेदाराचा बेफिकीर कारभार प्रवाशांच्या जीवाशी खेळ!

Work on Himayatnagar railway station : हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे काम थातूरमातूर; ठेकेदाराचा बेफिकीर कारभार प्रवाशांच्या जीवाशी खेळ!

नांदेड, तेलंगणा, महाराष्ट्र
हिमायतनगर, अनिल मादसवार| येथील रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र 42 कोटी रुपयांचा निधी खर्च होत असतानाही कामाची गती कासवाप्रमाणे आहे. ठेकेदाराकडून कामात गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेची पायमल्ली होत आसल्याचे उघडकीस येत असून, ठेकेदाराच्या नाकर्तेपणा बाबत प्रवासी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सिमेंट काँक्रेटचे काम फोडून पुन्हा नव्याने निकृष्ट दर्जाचे काम केले जात आहे. कामामध्ये स्टील कमी जाडीचे वापरले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. अंदाजपत्रकातील नियमाला बगल देत ठेकेदार सरळ मलिदा लाटत असल्याची प्रवाशांतून शंका व्यक्त केली जात आहे. जुन्या इमारतीला नव्याने बांधकाम करून “नूतनीकरण” दाखविण्याचा प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असून, यातून ठेकेदा...
error: Content is protected !!