women’s economic : महिला नागरी सहकारी पतसंस्थांमुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
नांदेड| राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमातून महिलांना बचत, गुंतवणूक आणि स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महिला सबलीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, योजनेतून आर्थिक मदत मिळालेल्या महिलांनी एकत्र येऊन पतसंस्था स्थापन केल्यास आर्थिक व्यवहार, बचत गटांची वाढ आणि लघुउद्योगांना चालना मिळणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांना याचा मोठा लाभ होईल, असे आवाहन सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक शाहुराज हिरे यांनी केले आहे.
या संदर्भात सहकार आयुक्त कार्यालयाने 11 जून 2025 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. त्यानुसार 8 मार्च 2019 च्या परिपत्रकातील निकष पूर्ण करणाऱ्या संस्थांची नोंदणी करण्यात येणार आहे. विविध क...
