Friday, June 26

Tag: the Vishnupuri project

Vishnupuri project : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली विष्णुपूरी प्रकल्पाला भेट देवून केली पाहणी

Vishnupuri project : जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केली विष्णुपूरी प्रकल्पाला भेट देवून केली पाहणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सतत पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले (District Collector Rahul Kardile) यांनी नांदेड येथील डॉ. शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाला (Vishnupuri project) भेट देवून प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील एकूण 18 दरवाजापैकी सध्या 4 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 48 हजार 478 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी अधिक करण्यात होईल. प्रकल्पातील पाण्याची सध्याची पातळी 353.25 मीटर आहे. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी (SCADA) एससीएडीए रूममध्ये #गोदावरीनदी वरील सर्व बंधाऱ्यांच्या पाणी पातळी संबंधांत तसेच उपसा सिंचन योजने संदर्भात सविस्तर माहिती घेतली. पूरस्थितीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत असून...
error: Content is protected !!