Sarathi : मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी
राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक,आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा,कुणबी,मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था सुरू केली आहे.मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था म्हणून ‘शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ या बोधवाक्याखाली छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था शिक्षण,मार्गदर्शन, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता, संशोधन आणि सांस्कृतिक वारसा संवर्धन या सर्व क्षेत्रांत 63 विविध उपक्रम राबवत आहे.
सारथी संस्थेमधील सन 2021-22 ते 2024-25 एकूण चार वर्षांमध्ये 8 लाख 38हजार 477 लाभार्थ्यांनी सहभाग घेतला असून अनेक विद्यार्थी या संस्थेमार्फत...
