The Garden : गार्डनची दुर्दशा, आरोग्यावर घाला! माॅर्निंग वाॅक ग्रुपचा एल्गार
नांदेड | हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले मोठ्या संख्येने माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडत आहेत. चैतन्यनगर ते सांगवी या विमानतळ रस्त्यालगत विकसित करण्यात आलेल्या गार्डनमध्ये दररोज शेकडो नागरिक येतात. मात्र देखभालीअभावी हे गार्डन सध्या अडचणींचे केंद्र बनले असून, नागरिकांच्या आरोग्यावरच घाला बसत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
सहा महिन्यांपूर्वीच टाकण्यात आलेला प्लेव्हर ब्लाॅकचा रस्ता दबला असून ठिकठिकाणी टेकड्या व खोल खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे चालताना घसरण्याचा धोका वाढला आहे. याशिवाय गार्डनमध्ये आवारा कुत्र्यांचा वावर, कचऱ्याचे ढीग, दारूच्या बाटल्या दिसून येत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माॅर्निंग वाॅक ग्रुपने आक्रमक भूमिका घेतली असून, येत्या ३० जानेवारी रोजी एकदिवसीय...
