Friday, June 26

Tag: The grand conclusion of the Kakda Aarti

Kakda Aarti : श्री परमेश्वर मंदिरातील काकडा आरतीचा भव्य समारोप दिंडी मिरवणुकीने उत्साहात पार पडला

Kakda Aarti : श्री परमेश्वर मंदिरातील काकडा आरतीचा भव्य समारोप दिंडी मिरवणुकीने उत्साहात पार पडला

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) हिमायतनगर शहरातील आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिरात मागील महिन्याभरापासून सुरू असलेल्या काकडा आरती उत्सवाचा समारोप सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने शहरातून पालखी दिंडी टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली होती. या भव्य शोभायात्रेत शहरातील महिला, पुरुष, तरुण, लहान बालके तसेच विविध भजनी मंडळींनी मोठ्या श्रद्धा-भावनेने सहभाग नोंदवला. टाळ-मृदुंगाच्या गजरात, “श्री परमेश्वराचा जयजयकार” घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडी मिरवणुकीची सुरुवात मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व सेक्रेटरी अनंतराव देवकते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. प्रारंभी मंदिरात श्री परमेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व भजन सादर करून दिंडीची सुरुवात झाली. त्यानंतर दिंडीने शहरातील मुख्य मार्ग, बाजारपेठ, बसस्थानक परिसर, तसेच विविध गल्लीबो...
error: Content is protected !!