Friday, June 26

Tag: State Festival

State Festival: Ganesh Chaturthi : राज्य महोत्सव : गणेशोत्सव

State Festival: Ganesh Chaturthi : राज्य महोत्सव : गणेशोत्सव

नांदेड, मुंबई, लेख
गणेशोत्सव हा महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात अतिशय उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे. श्री गणेश हे विघ्नहर्ता, बुद्धीचे दैवत व मंगलकार्याचे अधिपती मानले जातात. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यचळवळीच्या काळात या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले. त्यामागचा उद्देश समाजातील एकता वाढवणे व स्वराज्याच्या लढ्यासाठी लोकांना एकत्र आणणे हा होता. त्यामुळे गणेशोत्सवाला सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकही महत्त्व प्राप्त झाले. गणेशोत्सव हा फक्त धार्मिक उत्सव नसून तो समाजाला एकत्र बांधणारा, संस्कृती जपणारा आणि पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उत्सव आहे.  गणेशोत्सवाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन, त्यावर आधारित विविध उद्योग व  व्यवसाय यांना मोठ्या प्रमाणात चालना मिळते. राज्याची परंपरा व संस्कृती जपली जाते. ही परंपरा आणि  संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्याचे ...
error: Content is protected !!