Advocate Gunaratna Sadavarte : सक्षम ताटे हत्याकांड : एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये
नांदेड| नांदेडमध्ये विजातीय प्रेमप्रकरणातून झालेल्या सक्षम ताटे ( वय १९ वर्ष) यांच्या हत्याकांडाने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. सक्षमची प्रेयसी आँचल मामीडवार हिने अंत्यसंस्कारापूर्वी सक्षमच्या पार्थिव देहाशी विवाह केल्याची घटना चर्चेचा विषय ठरली आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज एडवोकेट गुणरत्न सदावर्ते नांदेडमध्ये पोहोचले आणि सक्षमच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
सदावर्ते यांनी सक्षमची प्रेयसी आँचलची भेट घेऊन तिला धीर दिला. घटनेच्या दिवशी तिला आरोपीकडून जीवघेणी धमकी मिळाल्याचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. घटनेची माहिती घेतल्यानंतर सदावर्ते म्हणाले की, "सक्षम ताटेची हत्या जातीयवादातून करण्यात आलेली अत्यंत क्रूर घटना असून ती संपूर्ण जगाने दखल घेतली आहे."
सदावर्ते यांनी इतवारा पोलिस ठाण्यातील कर्मचारी धीरज कोलमवाड यांनी आरोपी हिमेश मामीडवारला हत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा गंभ...
