Friday, May 15

Tag: of the people of Vikaslahi constituency

MLA Jitesh Antapurkar : संस्कृती जपतानाच विकासालाही मतदारसंघातील जनतेचे प्राधान्य – आमदार जितेश अंतापुरकर

MLA Jitesh Antapurkar : संस्कृती जपतानाच विकासालाही मतदारसंघातील जनतेचे प्राधान्य – आमदार जितेश अंतापुरकर

नांदेड, राजकीय
बिलोली | बिलोली–देगलूर विधानसभा मतदारसंघातील जनता आपली सांस्कृतिक ओळख जपतानाच विकासालाही तितकेच महत्त्व देते, असे प्रतिपादन आमदार जितेश अंतापुरकर यांनी केले. चैनपूर येथे सुमारे ९० लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास शिक्षण सभापती मिसाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य अनंत खानापूरकर, सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, निवृत्त अभियंता साहेबराव जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार अंतापुरकर पुढे म्हणाले की, “ज्या गावात माझे वडील शिक्षणासाठी राहिले, त्या गावाने त्यांना दिलेले प्रेम, स्नेह आणि आपुलकी मी कधीही विसरू शकत नाही. अंतापुर आणि चैनपूर ही दोन वेगवेगळी गावे असली, तरी मतदारसंघातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी माझी भूमिका नेहमीच सकारात्मक आणि विकासाभिमुख राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...
error: Content is protected !!