New executive committee : मसाप शाखा नांदेडची नूतन कार्यकारिणी जाहीर
नांदेड| मराठवाडा साहित्य परिषदेचे नूतन कार्यकारणी काल बिनविरोध निवडण्यात आली . अध्यक्षपदी बालाजी इबितदार ,उपाध्यक्षपदी दिगंबर कदम , श्रीनिवास मस्के यांची तर कार्यवाह पदी प्रा. महेश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
नांदेड येथील नानानानी पार्क मधील स्व. सुधाकरराव डोईफोडे ज्येष्ठ नागरिक सभागृहात मराठवाडा साहित्य परिषदेच्या २०२५ ते २०३० पर्यंतच्या कार्यकारिणीची निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ जगदीश कदम तर निवडणूक निरीक्षक म्हणून संजीव कुलकर्णी आणि देवीदास फुलारी यांनी काम पाहिले.
प्रारंभी दिवंगत साहित्यिक मारुती चितमपल्ली आणि नरेंद्र नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली. नंतर देवीदास फुलारी यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने निवडणुकी संदर्भात प्रस्ताविक केले. शाखेचे मावळते अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी आजपर्यंतचा शाखेच्या कार्याचा आढा...
