Who is the mayor of Himayatnagar..? हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? सोशल मीडियावर इच्छुकांची चर्चा
हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ओपन प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. यावेळी नगराध्यक्ष जनतेतून थेट निवडला जाणार असल्यामुळे राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. आरक्षण जाहीर होताच शहरात तसेच सोशल मीडियावर इच्छुकांचा प्रचार चांगलाच चुरशीचा झाला आहे. हिमायतनगरचा नगराध्यक्ष कोण..? (Who is the mayor of Himayatnagar..?) सोशल मीडियावर इच्छुकांची जोरदार चर्चा होते आहे.
शहरातील फेसबुक, व्हॉट्सअॅप स्टेटस, इंस्टाग्राम, टेलिग्राम यांसह स्थानिक सोशल प्लॅटफॉर्मवर “भावी नगराध्यक्ष”, “भावी नगरसेवक” अशी ओळख देत शेकडो इच्छुकांनी आपली छायाचित्रे, पोस्टर, बॅनर आणि व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांच्या समर्थकांनी देखील ‘आमचे नगराध्यक्ष’, ‘जनतेचा नेता’, ‘आमचा उमेदवार’ भाऊच अध्यक्ष होणार..? (Discussion ...
