Friday, June 26

Tag: in Kalambar Budruk

Passed away : कलंबर बु. येथे शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

Passed away : कलंबर बु. येथे शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर | लोहा तालुक्यातील उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे कलंबर बु. येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा पाय घसरून विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार, दि. १८ जानेवारी रोजी सकाळी घडली. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत शेतकऱ्याचे नाव गंगाधर गणेश मैलारे (वय ५१) असे असून, ते दररोजप्रमाणे आपल्या शेतातील गहू व हरभरा पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंप (मोटार) सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेले होते. यावेळी विहिरीच्या कडेला चालत असताना पाय घसरून तोल गेल्याने ते थेट विहिरीतील पाण्यात पडले. ही घटना सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. सध्या महावितरणकडून अचानक बदलत्या वेळेत विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना कधी सकाळी तर कधी दुपारी पाणी द्यावे लागत आहे. यामुळे शेतकरी झोपेतून उठून घाईघाईने शेतात जात असल्याचे चि...
error: Content is protected !!