Friday, June 26

Tag: in front of the Zilla Parishad

CITU protests : उमेद अभियानातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींना सेवेतून बडतर्फ करा – सीटूची जिल्हा परिषदे समोर तीव्र निदर्शने

CITU protests : उमेद अभियानातील भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींना सेवेतून बडतर्फ करा – सीटूची जिल्हा परिषदे समोर तीव्र निदर्शने

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) च्या वतीने जिल्हा परिषद नांदेड समोर ३ नोव्हेंबर रोजी तीव्र निदर्शने करण्यात आली. उमेद अभियानातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सीटू च्या आंदोलनातील प्रलंबीत मागण्या तातडीने सोडवाव्यात ही मागणी देखील करण्यात आली. उमेद अभियानाचे नायगाव तालुका व्यवस्थापक यांनी केलेल्या अपहाराची चौकशी करून त्यांच्यावर सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यापूर्वी सीटू संघटनेच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणातील मागण्या सोडविण्यात याव्यात अशा घोषणा देण्यात आल्या. उमेद अभियानामध्ये लाखो रुपयांचा अपहार झाला असून दोषींवर कारवाई होत नसल्याने निदर्शने करण्यात आली. मौजे सोमेश्वर, वाघी ता. जि. नांदेड येथे व अर्धापूर तालुक्यातील मौजे कोंढा येथे दलित अर्जदारा...
error: Content is protected !!