Friday, June 26

Tag: in field attacked by wild animal

attacked by wild animal : शेतात काम करणाऱ्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी

attacked by wild animal : शेतात काम करणाऱ्या महिलेवर वन्य प्राण्याचा हल्ला; महिला गंभीर जखमी

नांदेड, लाइफस्टाइल
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातील मौजे बामनगुडा येथील शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वन्य प्राण्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २३ रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वन्य प्राण्याला तात्काळ जेरबंद करण्याची मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे. माहूर व किनवट तालुका घनदाट जंगलाने व्यापलेला असून या परिसरात बिबट, अस्वल व अन्य वन्य प्राण्यांचा वावर आहे. मांडवी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बामनगुडा येथील शेतात लता सुरेश तोडसाम (वय ३५) या आपल्या पती, मुलगा व एका शेतशेजाऱ्यासोबत कापूस वेचण्याचे काम करीत होत्या. काही कामानिमित्त पती सुरेश तोडसाम घरी गेल्यानंतर शेताला लागून असलेल्या जंगलातून एका वन्य प्राण्याने अचानक झडप घालून महिलेवर हल्ला केला. या हल्ल्या...
error: Content is protected !!