Friday, June 26

Tag: Illegal sand mining

Illegal sand mining : तहसीलदार परळीकर यांची धडक कारवाई — चिंचोली-येळी परिसरातील अवैध वाळू उपसा बंद

Illegal sand mining : तहसीलदार परळीकर यांची धडक कारवाई — चिंचोली-येळी परिसरातील अवैध वाळू उपसा बंद

नांदेड, क्राईम
लोहा| लोहा तालुक्यातील महाटी, चिंचोली-येळी परिसरातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसावर तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल व पोलिस पथकाने गुरुवारी पहाटे धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत वाळू उपशासाठी वापरली जाणारी दोन इंजिने व फायबर बोटी जप्त करून त्यांना जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे वाळू माफियांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू होता. लोहा शहरात बिना नंबरच्या हायवा गाड्यांद्वारे उघडपणे वाहतूक होत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानुसार प्रशासनाने गंभीर दखल घेत अचानक सापळा रचत परिसरात छापा टाकला. प्रशासनाचे वाहन पाहताच वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आणि मोठी पळापळ उडाली. पथकाने घटनास्थळी आढळलेली दोन इंजिने ...
Illegal sand mining : पैनगंगा नदीकाठावरील अवैध वाळू उपसा उघड; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Illegal sand mining : पैनगंगा नदीकाठावरील अवैध वाळू उपसा उघड; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

क्राईम, नांदेड
हिमायतनगर (अनिल मादसवार) पैनगंगा नदीकाठावरील कामारी गाव परिसरात वाळू माफियांचा दबदबा वाढत चालला आहे. रोजच्याच व्यवहारात 3 ते 4 ट्रॅक्टर आणि डंपर भरून अवैधरीत्या वाळू उपसा आणि विक्री केली जात असल्याचे उघड (Illegal sand mining on the banks of Painganga river exposed) झाले आहे. एवढेच नव्हे तर या “वाळू साम्राज्याची” झलक बघून एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यालाही किंवा खाजगी क्षेत्रातील २० लाख वार्षिक पगारधारकालाही लाज वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. “प्रगती करावी ती वाळू माफियांनीच!” असा उपरोधिक सूर नागरिकांमध्ये उमटत आहे. कारण प्रामाणिकपणे जगणाऱ्याला कवडीमोल किंमत तर नियम मोडणाऱ्यांना सोन्याचे पर्वच लाभले आहे, असे चित्र येथे दिसून येत आहे. दिवाळीनंतर संपूर्ण हिमायतनगर तालुक्यात वाळू तस्करीचा विषय चर्चेत असून, कामारी परिसरातून सर्रास अवैध वाळू वाहतूक आणि विक्री केली जात असल्याचे सोशल मीडिय...
error: Content is protected !!