Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
नांदेड l भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण आज आपल्या राजकीय प्रवासाबद्दल विधानसभेत बोलताना भावूक झाल्याचे दिसून आले. मी पहिल्यांदाच निवडून आलेली आमदार आहे. मला भाऊ नाही, पण अभिमानाने सांगते की, माझ्या नांदेड जिल्ह्यातील आणि भोकर मतदारसंघातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांनी मला भावासारखी साथ दिली. त्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी लोकांचे प्रश्न मांडू शकत आहे, अशा भावनांनी ओथंबलेल्या शब्दांत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी महिलांसाठी शासकीय योजना व उपाययोजना या विषयावर प्रस्ताव मांडला होता. त्या चर्चेत सहभागी होताना आ. श्रीजया चव्हाण यांनी महिलांशी निगडित अनेक विषयांवर मते मांडली. आम्ही जिजाऊ, अहिल्यादेवी, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीआई आणि रमाईच्या लेकी...
