Rahul Kardile ; प्रत्येक पीक कापणी प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड l पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पुर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्राम विकास (जिल्हा परिषद) विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली. खरीप हंगाम सन २०२५-२६ साठी सर्व संबंधीतांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.
यावर्षापासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्यात येणार आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. पीक कापणी प्लॉटची आखणी, कापूस पिकांबाबत आवश्यक वेचनी, भात, सोयाबीन, ज्वार, तूर इत्यादींबाबत सुकविण्याचे प्रयोग,उत्पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाची आवश्यक छायाचित्रे, नोंदी संकलित कराव्यात. सर्व प्रयोग शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसारच पार पड...
