flood situation : पूरपस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन सतर्क
नांदेड| लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे.
पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली व हासनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. मुखेड तालुक्यातत खालील गावांमध्येप शोध व बचाव कार्य चालु आहे.
• रावनगाव येथे अंदाजे225 नागरिक पाण्याहच्याी वेढयामध्येा अडकलेले आहेत. पैकी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अडकलेले 7-8 जणांना सुखरुप वाचवले आलेले आहे. मस्जीधदवर अंदाजे 15-16 नागरीक अडकलेले आहेत त्यांडचा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडुन चालु आहे.
• हसनाळ- येथे अंदाजे 7-8 नागरीक अडकलेले आहेत त्यां चा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडुन करण्यात आली आह...
