flood victims ; पूरग्रस्तांचा हक्क द्या, प्रलंबित नुकसानभरपाई खात्यात जमा करा ; अन्यथा फारुक अहमद यांचा आमरण उपोषणाचा इशारा
नांदेड l जिल्ह्यातील पुरग्रस्त नागरिकांना गेल्या वर्षीची शासनाकडून मंजूर झालेली नुकसानभरपाई अजूनही खात्यात जमा झालेली नाही. शासनाकडून निधी येऊन अनेक महिने उलटले तरी प्रशासन यादी पडताळणीच्या नावाखाली टाळाटाळ करत आहे म्हणून प्रशासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आमरण उपोषणाचा हत्यार उपसणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडी, नांदेड तर्फे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या निष्काळजी, बेजबाबदार व अमानुष भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.
Disaster Management Act 2005, कलम 24(1) नुसार जिल्हाधिकारी मदत वितरणासाठी जबाबदार आहेत.सुप्रीम कोर्ट – Swaraj Abhiyan v. Union of India (2016) : आपत्तीग्रस्तांना मदत हा घटनात्मक “हक्क” आहे. गुजरात हायकोर्ट (2017, Suo Moto PIL) : मदत “प्रति कुटुंब” द्यावी, “प्रति घर” नव्हे.उपरोक्त कायद्यांच्या आधारे वंचि...
