Nadwa Bridge Work : हिमायतनगर–पळसपूर नडवा पुलाचे काम निकृष्ट; 26 जानेवारीपासून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे बेमुदत आमरण उपोषण
हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर ते पळसपूर रस्त्यावरील नडवा नदीवरील पुलाचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचा गंभीर आरोप करत, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि. 26 जानेवारी 2026 पासून पुलाच्या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे युवा तालुकाध्यक्ष माधव किशन शिंदे यांनी जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत सविस्तर निवेदन सादर केले आहे. यापूर्वी दि. 7 जानेवारी 2026 रोजी देखील याच विषयावर तक्रार देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणतीही तांत्रिक चौकशी करण्यात आलेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या कामामध्ये रेतीऐवजी डस्टचा वापर, अंदाजपत्रकात नमूद असलेल्या लोखंडी सळयांऐवजी 8 mm व 10 mm गजांचा वापर, गुत्तेदाराकडू...
