Friday, June 26

Tag: blossoming from the mango blossoms..

Mango Blossoms : आंबेमोहराच्या फुलांतून उमलणारी ऋतूची भाषा….

Mango Blossoms : आंबेमोहराच्या फुलांतून उमलणारी ऋतूची भाषा….

नांदेड, फोटो गॅलरी
गेल्या चार दशकांहून अधिक काळ कॅमेरा हातात घेताना माझ्यासाठी छायाचित्रण म्हणजे केवळ दृश्य टिपणे नव्हे, तर काळाला थांबवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे. उन्हाळ्याची रखरख, पावसाळ्याची ओलसर शांतता  तर कधी महापूर अतिवृष्टी आणि हिवाळ्याची धूसर बोचरी कडाक्याची थंडी प्रत्येक ऋतू आपल्यासोबत वेगळा रंग, वेगळा गंध आणि वेगळी भावना घेऊन येतो. त्या ऋतूतील सुर्योदय -सुर्यास्त त्या भावना छायाचित्रांच्या माध्यमातून जतन करणे, हेच माझ्या छायाचित्रणाचे मूळ उद्दिष्ट आहे. शेतात डोलणारी धान्याची पिके, फळबागांतील मोहर, रानावनातील पानझड, नव्याने फुटणारी हिरवी पालवी, गावोगावी होणारे सण-उत्सव, यात्रा, बाजारात येणारी देशी-विदेशी फळे—या साऱ्यांचा ऋतुसापेक्ष संदर्भासह संग्रह करणे म्हणजे निसर्गाचे दस्तऐवजीकरण होय. प्रत्येक छायाचित्रासोबत त्या वस्तूचे नाव, वैशिष्ट्य, आवड-निवड, गुणधर्म आणि त्यामागचा प्रदेशही जतन क...
error: Content is protected !!