OBC Elgar Mahamorcha : ओबीसी एल्गार महामोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहा — ॲड. अविनाश भोसीकर यांचे आवाहन
नांदेड| नांदेड येथे होणाऱ्या भटके विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजाच्या एल्गार महामोर्चाला लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ॲड. अविनाश भोसीकर यांनी केले आहे. ओबीसींच्या हक्क, आरक्षण आणि सन्मानासाठी हा मोर्चा ऐतिहासिक ठरणार असल्याचे ते म्हणाले.
ओबीसी समाजाच्या आरक्षणावर जाणीवपूर्वक गदा आणण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ॲड. भोसीकर म्हणाले की, “भटके, विमुक्त, बलुतेदार आणि ओबीसी समाजावर सतत अन्याय होत आहे. आरक्षणाचे हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. शासनाने २ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेला ओबीसी विरोधी शासन निर्णय (जीआर) हा समाजघातक असून, तो तात्काळ रद्द करण्यात यावा.” त्यांनी सांगितले की, “समाजातील सर्व घटकांनी आता जागे व्हावे. आपला हक्क, आपली ओळख आणि आपला सन्मान वाचवण्यासाठी ओबीसी समाजाने एकदिलाने रस्त्यावर उतरले पाहिजे. हा मोर्चा ही केवळ निदर्शने नसून, आपल्या अस्तित्वासाठी...
