Police Recruitment : पोलीस भरतीच्या उमेदवारांना सरावासाठी मिळणार मैदाने खा.. अशोकराव चव्हाण यांचा पुढाकार
नांदेड| माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पोलीस भरतीच्या उमेदवारांच्या सरावाकरिता मैदाने उपलब्ध करुन देण्याबाबत निर्णय घेतला आहे.
पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांनी तातडीने उमेदवारांना सरावाकरिता मैदाने देण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. दरम्यान, भाजप विद्यार्थी आघाडीचे नांदेड महानगराध्यक्ष स्वप्नील नरहरे व भाजयुमोचे महानगराध्यक्ष शशिकांत क्षीरसागर यांनी पोलीस भरतीच्या अनेक उमेदवारांसह त्यांची भेट घेऊन मैदानांसह अनेक अनुषांगिक मागण्या केल्या होत्या. त्यानंतर खा. अशोकराव चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला लेखी पत्र देऊन मैदान उपलब्ध करुन देण्याचे निर्देशित केले होते.
त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नांदेड शहरातील यशवंत कॉलेज, पिपल्स कॉलेज आणि सायन्स कॉलेजला पत्र पाठवून त्यांच्या संस्थ...
