Saturday, June 27

Tag: 8 contenders for the post of mayor

Kandhar Election : कंधारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले! १० प्रभागांतून तब्बल १२० अर्ज, नगराध्यक्षपदासाठी ८ दावेदार

Kandhar Election : कंधारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले! १० प्रभागांतून तब्बल १२० अर्ज, नगराध्यक्षपदासाठी ८ दावेदार

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार नगरपरिषद निवडणूक २०२५ साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा अंतिम दिवस राजकीय गजबजाट, कार्यकर्त्यांची धावपळ आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला होता. सुरुवातीला मंद गतीने सुरू झालेली अर्ज प्रक्रिया शेवटच्या दिवशी मात्र जोरदार वेगाने पुढे सरसावली. नगरपालिकेच्या दहा प्रभागातून नगरसेवक पदांच्या 20 जागेसाठी एकूण १२० अर्ज, तर नगराध्यक्षपदासाठी ८ अर्ज दाखल झाले असून कंधारमध्ये निवडणूक चुरशीची आणि अनेक राजकीय समीकरणे बदलणारी ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. पहाटेपासूनच पालिका कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. गाड्या, पक्षाच्या दस्त्या, घोषणा आणि कार्यकर्त्यांच्या गजबजाटामुळे पालिका परिसर निवडणुकीच्या वातावरणाने थरारून गेला. अर्ज भरण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ सुरूच होती. सर्वाधिक अर्ज प्रभाग क्रमांक १ मध्ये १९ आणि प्रभाग १० मध्ये १८ दाखल झाले...
error: Content is protected !!