शिवणी, भोजराज देशमुख।किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील दयाळ धानोरा येथील श्री शिखर कैलास टेकडी येथे २२ व्या वार्षिक उत्सव निमित्ताने दि.०५ डिसेंबर ते ०९ डिसेंबर २०२४ पर्यंत संत श्री लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात दि.०५ डिसेंबर पासून होम हवन,लक्ष्मण शक्ती पूजा,महापूजा,महा आरती व महाप्रसादाचे आयोजन मंदिर संस्थान कडून करण्यात आले होते.या वेळी तेलंगणा महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील लाखो भाविक नर्मदेश्वर मंदिराचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतले आहे.
किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेवरील डोंगराच्या कुशीत निसर्गरम्य वातावरणात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिखर कैलास टेकडी दयाळ धानोरा येथे दि.०५ ते ०९ डिसेंबर पर्यंत सतत चालणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे समारोपन दि ०९ डिसेंबर रोजी ह.भ.प.भीमराव महाराज फुटानकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व बालब्रम्हचारी सत्तगुरू रामराव बापू महाराज यांना भोग देऊन २२ व्या वार्षिक महोत्सवाची सांगता करण्यात आली.
श्री.शिखर कैलास टेकडी महादेव मंदिरचे विश्वस्त संत लिंबाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यात विश्व हिंदू परिषदचे उपाध्यक्ष सुरेश महाराज यांची उपस्थिती होती .तर दि.०८ डिसेंबर रविवार रोजी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, दि.०७ डिसेंबर शनिवार रोजी तेलंगणा राज्यातील बोथ तालुक्याचे आमदार अनिल जाधव, कांग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र आडे व बोथ पंचायत समितीचे तुला श्रीनिवास यांनी व दि.०६ डिसेंबर रोजी भाजपाचे वरिष्ठ नेते सुधाकर भोयर सह सामाजिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील शेकडो मान्यवर श्री शिखर कैलास टेकडी येथील नर्मदेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.
या शिखर कैलास टेकडीचा २२ व्या वार्षिक उत्सव यशस्वीतेसाठी तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांनी सेवा समर्पित केले.तर कायदा सुव्यवस्था अबाधित रहावे या साठी महाराष्ट्र तेलंगणा राज्यातील पोलीस प्रशासन, वनविभाग , वनविकास महामंडळ, आरोग्य विभाग यांनी सेवा दिली.या वेळी श्री शिखर कैलास टेकडीचे विश्वस्त संत श्री.लिंबाजी महाराज यांच्या वतीने मंदिर संस्थान कडून सर्व शिव भक्तांचे आभार मानले.