नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिकेत *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांनी बैठकीच्या आयोजन करून दि.१२/०९/२०२४ रोजी या योजनेच्या कामाचा आढावा घेतला.
सदरील बैठकीत या योजनेचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करून बहुसंख्य नागरिकांना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचे यावेळी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत. तसेच मागील बैठकीत सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना प्रत्येकी १००-१०० या प्रमाणे फॉर्म दिले होते. त्याचाही आढावा आयुक्तांनी घेतला.
सर्व क्षेत्रीय अधिकारी व DAY-NULM योजने विभागामार्फत जास्तीत जास्त फॉर्म जमा करून ते दि.२०/०९/२०२४ पर्यंत कार्यालया मध्ये फॉर्म जमा करणे बाबत सूचना दिल्या तसेच DAY-NULM विभागामार्फत सर्व समुदाय संघटक मार्फत फॉर्म घेऊन त्यांना झोन निहाय फॉर्म जमा करण्यास सांगण्यात आले तसेच या ठिकाणी बॅनर व टेबलची व्यवस्था ही क्षेत्रीय अधिकारी यांनी करावी अशा सूचना यावेळी आयुक्तांनी केल्या आहेत.
सदर बैठकीस उपआयुक्त (प्रशासन) श्री कारभारी दिवेकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड तसेच क्षेत्रीय अधिकारी डॉ. मिर्झा बेग, श्री रमेश चौरे, श्री रावण सोनसळे, श्री संभाजी काष्टेवाड, कार्यालय अधिक्षक श्री गौतम कवडे, श्री जिंतूरकर, सहाय्यक आयुक्त श्री सुधीर इंगोले, नोडल अधिकारी श्री अशोक सूर्यवंशी, व्यवस्थापक (DAY-NULM), श्री.चंद्रकांत कदम, व्यवस्थापक (DAY-NULM), श्री.प्रविण मगरे, व्यवस्थापक (DAY-NULM) आदिंची बैठकीस उपस्थिती होती.