किनवट,परमेश्वर पेशवे। महाराष्ट्र भाजपाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळवता आल्या नसल्याची जबाबदारी स्विकारुन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्वयंस्फूर्त कार्यमुक्त होऊन राज्यात विस्कटलेली घडी सावरण्यासाठी पंकजाताई मुंडेकडे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्याच्या मागणीने किनवटपासून सुरुवात केली आहे.
परवाच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारा मिळालेली मते आणि किनवट विधानसभा मतदारसंघात आमदारांना मिळालेल्या मतांची समिक्षा व्हायला पाहिजे. झालेल्या नुकसानीला भाजपाने गांभीर्याने घेतले नसल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा दारुण पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावणार हे अटळ आहे. पक्षांतर्गत गटातटात विखुरलेल्या भाजपाला बहूजन नेत्या पंकजाताईच तारु शकतात अशा कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित होतांना दिसतात.
भाजपातील निष्ठावंतांची अग्नीपरिक्षा कधी संपवणार की, अशाच सतरंज्या उचलायला लावणार ? यावरही कार्यकर्त्यांमध्ये कमालीच्या चर्चा ऐकायला मिळते. जातनिहाय बेरीज-वजाबाकीचे गणित करुन वेळप्रसंगी बाहेरच्यांनासुद्धा आमदारकीची संधी मिळते. मात्र ज्यांनी पक्षसंघटन मजबुतीसाठी जीवाचे रान केले असे ते धरमसींग राठोड, डाॅ.अशोक सुर्यवंशी, प्रा.किशनराव मिराशे, अॅड.रमण जायभाये असे अनेक दिग्गज आहेत. पक्षासाठी एकनिष्ठितेने काम करतात. पक्षांतराच्या कोल्हांटउड्या न मारता पक्षाच्या चढउताराचे ते साक्षीदार आहेत. नवे-जुने हा वितंडवाद संपुष्ठात आणण्यासाठी पंकजाताईंच्याच नेतृत्वाची आवश्यकता अनेकांनी व्यक्त केली.
मोदी-शहांच्या कर्तुत्वाला, नेतृत्वाला भाराऊन दिव्यांग प्रदेशाध्यक्ष रामदास पाटलांसारख्या अनेकांनी नोकरीला ठोकर मारुन भाजपा प्रवेश केला. हिंगोली लोकसभेची उमेदवारीचा अंदरुनी ग्रीन सिग्नल मिळाल्याने रानदास पाटलांनी सर्वच पैलूंवर कर्तुत्वातून छाप बसवली मात्र ऐनवेळी त्यांच्याही उमेदवारीला ब्रेक दिले त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग संतापला. अशी किती उदाहरणं द्यायची ? की, नेतृत्वाने प्रचंड चुका केल्या.
प्रधानमंत्री मोदींनी तिसर्यांदा शपथविधी, मंत्रीमंडळ स्थापनेची हॅट्रीक पूर्ण केल्याचा हिंदूस्थानभर जल्लोष साजरा हैत असतांना किनवटमध्ये मात्र अशोकराव नेम्मानिवारांच्या नेतृत्वाखाली छ.शिवाजी महाराज चौकात जल्लोष साजरा झाला. पक्षाच्या नावावर गुत्तेदारी करणारे, गुत्तेदारांच्या कमीशनचा मलिदा लाटणारे, बडेबडे गुत्तेदार जल्लोषाकडे फिरकलेच नाहीत. स्थिनिक पक्षाची अशी स्थिती असेल, लोकप्रतिनिधींचे दूर्लक्ष होत असेल तर, चंद्रशेखर बावनकुळेंच्या राजिनाम्याशिवाय पर्यायच नाही. ते स्वयंस्फूर्त राजिनामा देत नसतील तर, किनवटातून पदाधिकार्यांनी राजिनामासत्र सुरु हाच एकमेव रामबाण उपाय असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणने आहे.