Homeकरियरविद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे – पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे

विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे – पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे

राजा भगीरथ विद्यालयात व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम; विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याचा संदेश

हिमायतनगर, अनिल मादसवार| विद्यार्थ्यांनी तंबाखू, गुटखा, दारू आणि अमली पदार्थांसारख्या व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, संस्कार आणि चांगल्या सवयींना प्राधान्य द्यावे. व्यसनांमुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर कुटुंब आणि समाजाचेही मोठे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले .

राजा भगीरथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिमायतनगर येथे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी व्यसनांचे शरीर, मन, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक वातावरणावर होणारे दुष्परिणाम सविस्तरपणे समजावून सांगितले. तरुण वयात चुकीच्या संगतीमुळे किंवा कुतूहलापोटी व्यसनांच्या आहारी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य मित्रांची निवड करावी, वाईट सवयींपासून दूर राहावे आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सांगितले.

व्यसनांपासून दूर राहणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून निरोगी आणि सुसंस्कृत समाज घडविण्यासाठी आवश्यक बाब आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः व्यसनमुक्त राहून आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तरवार सर होते. माजी मुख्याध्यापक अनगुलवार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर पर्यवेक्षक दिक्कतवार सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस निरीक्षक केंद्रे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांनी मनापासून ऐकले. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments