Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - Shankarraoji Chavan Vishnupuri Project : शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित
कृषी नांदेड December 4, 2025

Shankarraoji Chavan Vishnupuri Project : शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत रब्बी हंगामासाठी पाणी पाळ्याचे वेळापत्रक निश्चित

NNL TeamBy NNL TeamDecember 4, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्याअनुषंगाने रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात बुधवार 10 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावी, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) चे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

यावर्षी प्रकल्पावरील कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झाली नसल्याने आगामी कालवा सल्लागार समितीच्या बैठकित होणाऱ्या निर्णयाच्या अधीन राहुन 15 ऑक्टोंबर 2025 रोजीच्या शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पातील (80.79 दलघमी) 100 टक्के इतक्या जिवंत पाणीसाठ्यावर आधारीत उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्यासाठीचे पाणी राखीव ठेऊन रब्बी हंगामात दोन (2) पाणीपाळ्या देण्याचे नियोजित आहे.

प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारकांना अधिसुचित नदी-नाल्यावरील तसेच मुख्य कालव्यावरील प्रवाही व कालवा उपसा सिंचन योजना धारकांनी रब्बी हंगामातील उभी पिके व चारा पिके या पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, कालव्यावरील उपसा, नदी-नाल्यावरील मंजूर उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यायचे असल्यास मागणी अर्ज नमुना 7-7अ मध्ये भरुन सोबत थकीत पाणीपट्टी व चालू हंगामाची अग्रीम रक्कम भरण्यात यावी तरच पाणी अर्ज मंजूर करण्यात येईल अन्यथा पाणी अर्ज नामंजूर झालेल्या अर्जदारांना पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. बुधवार 10 डिसेंबर 2025 पुर्वी संबधित शाखा कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील. सिंचनासाठी पाण्याची गरज तसेच विहीत नमुन्यात प्राप्त मागणी अर्ज संख्या विचारात घेऊनच प्रत्यक्ष सिंचनासाठी पहिली पाणीपाळी दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी सुरु करण्याचे अपेक्षित नियोजन आहे. शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पांतर्गत व त्याअंतर्गत असलेल्या वितरण व्यवस्थेद्वारे प्रत्येक पाणीपाळीच्या कालवा संचलनाच्या प्रस्तावीत कार्यक्रमानुसार प्राप्त मागणीनुसार सिंचनासाठी सोडण्यात येईल.

रब्बी हंगाम सन 2025-26 मधील पाणीपाळीच्या प्रस्तावित कार्यक्रम
आवर्तन क्र. 1 दि. 15 डिसेंबर 2025 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत कालावधी 30 दिवस आहे. तर आवर्तन क्र. 2 दि. 25 जानेवारी 2026 ते 24 फेब्रुवारी 2026 कालावधी 30 दिवस पर्यंत राहील. पाऊस व आकस्मिक कारणामुळे पाणीपाळी संख्या, कालावधी व तारखांमध्ये बदल होऊ शकतो.

शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याचे पंप व उध्दरण नलिका यांना बसवून 35 वर्षाचा कालावधी झालेला असून त्यांचे आर्युमान संपलेले आहे. त्यामुळे चालू पाणी पाळीमध्ये पंप व उद्धरण नलिकाच्या खराब स्थितीमुळे व्यत्यय आल्यास पाणीपाळी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यक्षेत्रातील शेतक-यांनी ही बाब विचारत घेऊनच पिक पेरणी करावी.नमुना नं. 7,7-अ प्राप्त झालेल्या पाणी अर्जात खालील अटी व शर्तीचे अधीन राहुन मंजुरी देण्यात येईल.

रब्बी हंगामी, पिकांसाठी कालव्याचे प्रवाही, मंजूर उपसा, मंजूर जलाशय उपसा व मंजूर नदी, नाले उपसा सिंचनासाठी ज्यांना पाणी घ्यावयाचे आहे त्यांनी आपले पाणी मागणी अर्ज विहीत नमुन्यात दि.10 डिसेंबर 2025 पूर्वी संबंधित शाखा कार्यालयात माहिती भरून सादर करावेत. लाभधारकांना त्याच्याकडील संपुर्ण थकबाकी पाणीपट्टी भरावी लागेल. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आरच्या पटीत असावे. कालवा संचलन कार्यक्रमानुसारच पाणी घेणे बंधनकारक राहील. पाणीपट्टी न भरणाऱ्या व पाणी अर्ज नामंजूर असलेल्या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयास बंधनकारक राहणार नाही.

काही अपरिहार्य कारणास्तव किंवा तांत्रिक कारणास्तव पाणी पुरवठा करणे शक्य न झाल्यास होणाऱ्या नुकसानीस हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976,कालवे नियम 1934,म.सिं.प.शे.व्य.कायदा 2005 तसेच महाराष्ट्र जलसंपदा विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या तरतुदीनुसार सर्व शर्ती व अटी बंधनकारक राहतील याची सर्व लाभधारकांनी नोंद घ्यावी. लाभधारकांनी दिवस व रात्रीच्या वेळेस पाणी घेणे बंधनकारक आहे. रात्रीच्या वेळेस पाणी न घेतल्यामुळे पाणी नदीनाल्यास वाया जाऊन ठराविक मुदतीत पाणी न मिळाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही.

शासन निर्णयाप्रमाणे विहीत दरानुसार पाणीपट्टीचे दर आकारण्यात येतील. थकीत व चालू पाणीपट्टी वेळेत भरून सहकार्य करावे. शेतचारी स्वच्छ व दुरुस्त ठेवण्याची जबाबदारी संबंधित लाभधारकांची राहील. उडाप्याच्या अंतिम क्षेत्रास पाणी पुरवठा करणे बंधनकारक राहणार नाही. पाणी पाळी सुरू असताना जबरदस्तीने अथवा विनापरवानगी विद्युत मोटारी, ट्रॅक्टर द्वारे पाणी उपसा केल्यास अथवा गेट उघडल्यास नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सबंधीत प्रकल्पाच्या विभागामार्फत सर्व लाभधारकांना पाणी मिळेल या दृष्टीने पुरेपुर प्रयत्न करण्यात येत आहेत. याची संबधित लाभधारकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर)चे उपकार्यकारी अभियंता बी.जे.परदेशी यांनी केले आहे.

Irrigation schedule for Rabi season fixed under Shankarraoji Chavan Vishnupuri Project
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCamp on HIV held : आयटीएम कॉलेजमध्ये एचआयव्ही विषयावर शिबिर संपन्न  
Next Article Scholarship Scheme : साफसफाई, आरोग्यास धोकादायकक्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना 
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chief Executive Officer Meenal Karanwal : जिल्हा परिषद शाळांच्या मालकीच्या नोंदींसाठी विशेष मोहीम

March 14, 2025

Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

February 21, 2026

Himayatnagar : हिमायतनगर प. स. सभापती पदाचे अनेकांना लागले डोहाळे… चार गणाची आरक्षण सोडत सोमवारी

October 11, 2025

Vice Chancellor Dr. Manohar Chaskar : कला आणि मूल्यशिक्षण आवश्यक – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

September 29, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Diwali ; वृत्तपत्र विक्रेता संंघटना‌ तरोडा नाका‌ नांदेड यांच्या ‌वतीने तरोडा नाका‌ येथील वृत्तपत्र विक्रेते यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप – NNL

General, Expenditure and Inspectors : सामान्य, खर्च व पोलीस विभागाचे निरीक्षकांचे दूरध्वनी जाहीर – NNL

दिव्यांग विद्यार्थ्यांचे कर्तृत्व सामान्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी -NNL

Hadgaon : हदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे आजी माजी आमदार खासदार एका मंचावर दिसणार

woman : ‘बाई’ या शब्दातून उमटणारी स्त्रीची सामाजिक ओळख

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?