हिमायतनगर, अनिल मादसवार| सोशल मीडियावर मी नितीन मुधोळकर यांची पोस्ट पहिली कि येथील मंजूर झालेला निधी परत गेला. त्यावर संपर्क करून माहित घेतली आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हिमायतनगरच्या वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीला पालकमंत्री गिरीशजी महाजन यांनी डीपीडीसी मधून प्रतिक्षालय बांधकामासाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाला सुरुवात होऊन येथे येणाऱ्यांना बसण्याची सोय होणार आहे. यावरही स्मशान भूमीत आणखी काही करायच असेल तर मला हाक द्या. सरकार कुणाचंही असो वैकुंठधाम स्मशान भूमीचा कायापालट करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करिन असे अभिवचन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटेश पाटील तालंगकर यांनी दिली.
दिनांक ११ शुक्रवारी वैकुंठधाम स्मशान भूमीतील प्रतिक्षालय बांधकामाच भूमिपूजन सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटेश पाटील तालंगकर यांच्या हस्ते थाटात संपंन्न झाला. यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितले कि, लकडोबा चौक परिसरातील वैकुंठधाम हिंदू स्मशान भूमीचा कायापालट करण्याचा युवकांनी केलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेवरून पालकमंत्री गिरीशजी महाजन यांनी डीपीडीसी मधून हिमायतनगर स्मशान भूमीच्या प्रतिक्षालय बांधकामासाठी १५ लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
एक वर्षापासून या स्मशानभूमी परिसरात दर रविवारी 2 तास श्रमदान करून युवकांनी स्मशानभूमीचा कायापालट केला आहे. आज स्मशान भूमी परिसरात, हिरवी झाडे, विद्दुत रोषणाई आणि मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्याच्या जागेची अप्रतिम सुधारणा झाली आहे. स्मशानभूमीचा कायापालट झाल्याचे पाहून श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टने श्री शंभु शंकर महादेवाची एक मूर्ती भेट दिली. तसेच मुख्य प्रवेशद्वारावर भव्य कमान बांधून देण्याच्या कामाला सुरुवात केली. नुकतेच पितृपक्षापासून येथील स्मशान भूमीत युवकांनी कावळा पंगत सुरु केली. स्मशानभूमीत अंत्यसंकराला येणाऱ्या पाहुण्यांना हात पाय धुण्याची व्यवस्था, शुद्ध पिण्याचे पाणी परिसराची स्वच्छता पाहून युवकांच्या कामाचे कौतूक केले.
शरद पवार साहेब आणि अजितदादा यांच्या दोन्ही कुटुंबातील माझे सदस्यत्व कायम आहे, दोघेही मला तेवढाच प्रेम करतात त्यामुळे सरकार महाविकास आघाडीचा येऊ कि महायुतीचा मला दोघांचेही सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे आपल्याला कोणत्याही कंची अडचण येणार नसून, यापुढे हि माझ्यासाठी काही काम असले तर सांगा आपण ते करून घेऊ अशा विश्वास त्यांनी दिला. यावेळी श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे उपाध्यक्ष महावीरशेठ श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड गुरुजी, आदींसह शहरातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.