किनवट, परमेश्वर पेशवे| महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भात सीमेवर असलेला निसर्गाच्या सानिध्यात नटलेला सुप्रसिद्ध धबधबा म्हणून सहस्रकुंड धबधब्याकडे बघितले जाते . या सहस्त्रकुंड धबधब्यावरील मनोहरी दृश्याने अनेक पर्यटकांना भुरळ टाकली. त्यातच हा धबधबा पाहण्यासाठी आंध्र तेलंगणा महाराष्ट्र सह राजस्थान या राज्यातूनही पर्यटक या धबधब्याकडे लक्ष केंद्रित करतात. निसर्गाच्या सानिध्यात नटलेल्या या धबधब्याने ते आता चक्क महाराष्ट्रच नव्हे तर देशाबाहेर असलेल्या स्पेन मॅरीसिको विदेशी पर्यटकांनाही मनमोहीत केल्याचे दृश्य आता पहावयास मिळत आहे.
स्पेन मॅरीसिक व येथील टीमने भारतातील तेलंगणा राज्यातील म्हैसा येथे पुण्याच्या एका संस्थेच्या माध्यमातून आयुर्वेदा संदर्भात अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित केला. या दौऱ्यातील सुट्टीच्या दिवसाचा आनंद लुटण्यासाठी स्पेनच्या टीमने महाराष्ट्रातील नामांकित पर्यटन स्थळ असलेल्या सहस्रकुंड धबधब्यांना दिनांक 25 ऑगस्ट रोजी अचानक अकरा वाजेच्या सुमारास भेट दिली. या भेटीदरम्यान या टीमशी संवाद साधत असताना महाराष्ट्रातील एक अनमोल रत्न असलेला हा सहस्रकुंड धबधबा असून मनमोहक व उत्साहवर्धक निसर्गाकडून निर्माण झालेला एक अजूबा आहे असे मत या टीमने व्यक्त केले.
या पर्यटन स्थळाची महाराष्ट्र शासनाने योग्य ती दखल घ्यावी व या पर्यटन स्थळाचा विकास साधावा असा प्रखर सवाल ही या टीमने व्यक्त केला. या पद्धतीचे पर्यटन स्थळ जर आमच्या देशात असतं तर आमच्या देशाचे सरकार अशा पर्यटन स्थळासाठी अब्जावधी रुपये खर्च केल आसत असे म्हणाला हि टिम विसरली नाही. विदेशातील पर्यटकांनी व्यक्त केलेली भावना म्हणजे आपल्या शासनाला एक चपराकच म्हणावी लागेल . आता विदेशातील पर्यटकांच्या भावनांचा विचार करून तरी महाराष्ट्र शासनाने या पर्यटन स्थळाकडे लक्ष वेधावे अशा स्वरूपाची मागणी आता पर्यटन प्रेमी मंडळी करून करण्यात येत आहे.