Ghagar morcha : वार्ड क्र. १३ मधील महिलांचा नगरपंचायतीवर घागर मोर्चा उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाईची तीव्र झळ
हिमायतनगर (प्रतिनिधी) हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक १३ मध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने संतप्त महिलांनी व नागरिकांनी नगरपंचायतीवर घागर मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले. घडाभर पाण्यासाठी अबालवृद्धांना दाहीदिशा भटकंती करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
वारंवार मागणी करूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप करत महिलांनी नगरपंचायतीसमोर रिकाम्या घागरींसह आंदोलन केले आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतो; मात्र पाण्यासाठी दिवसभर फिरावे लागत असल्याने मजुरीचे काम बुडते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन देऊन मतदान घेतले गेले; परंतु आता आमच्या ज्वलंत समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही. नगराध्यक्ष व नगरसेवक बॅनरबाजी आणि सत्कार समारंभात व्यस्त असून, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी वेळ दे...
