श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यात कपासी व इतर बियाणे खते कीटकनाशकांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढया दराने विक्री करून शेतकऱ्यांची लुट बियाणे विक्रिते व कृषी केंद्रचालकांनी चालविल्याने अनियमितता करणाऱ्या कृषी साहित्य विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोर सेने तर्फे दि. १० जून रोजी वाई बाजार फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या वेळी गोर सेनेच्या कार्यकर्त्यासह अनेक शेतकरी सहभागी आले होते. तब्बल दोन तास वाहतूकीचा खोळंबा झाला होता. तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्रीधर गडगीडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकाचे निवेदन घेऊन गोर सेना माजी तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांचेशी चर्चा केली.
बियाणे, खते व कीटकनाशकाची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लुट करणाऱ्या कृषी दुकानदारांची चौकशी करून अनियमितता केल्या प्रकरणी कारवाई करण्यात येईल व कुणाचीही गय केल्या जाणार नाही असे आश्वासन दिल्याने आंदोलन थांबविण्यात आले.
यावेळी सिंदखेड पोलीस स्टेशनचे स.पो.नि. सुशांत किनगे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ता.उपाध्यक्ष उकंड पवार, यादव आडे, संदेश नाईक, संदीप राठोड, कुणाल राठोड, निकेश राठोड, बादल, जाधव, अमोल शेंडे, खुर्शीद भाई, शंकर चव्हाण, अविनाश राठोड, कैलास जाधव, प्रशांत राठोड, संतोष चव्हाण, रवी राठोड, गोविंदराव कारभारी, विजय जाधव, मुरली राठोड, समाधान पवार, राहुल राठोड आदीसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.