नांदेड l राष्ट्रीय कलाल,गौड,तेलंग समाज युवा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष तथा कलाल,
गौड,तेलंग समाज च्या प्रतिष्ठाण चे संस्थापक अध्यक्ष सुनिल प्रभाकर अनंतवार यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे दि.१ डिसेंबर रोजी नांदेड दक्षिणचे आ.आनंद तिडके पाटील बोंढारकर यांचा फेटा,पुष्पहार, शाल टाकून भव्य जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी नांदेड दक्षिण चे पदाधिकारी तुलजेश यादव, नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष उद्धव पाटील शिंदे, सिडको शहर प्रमुख सुहास पाटील खराणे, यांचासत्कार करण्यात आला .
प्रदेशाध्यक्ष सुनिल अनंतवार यांनी कलाल समाजातील बऱ्याच समस्यांवर चर्चा केली . आ.आनंद तिडके पाटील बोंढारकर यांनी आपण केलेल्या कलाल समाजातील समस्यांवर नक्कीच विचार करुन कलाल समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले .
या कार्यक्रमाला कलाल समाजातील उद्योजक गणेश नंदेवार, निवासी अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाराव ईबीतवार, प्राथमिक शिक्षक संघाचे गंगाधर नंदेवाड,सुधीर भुरेवार,मारोती कुंडलवार,अविनाश घंटलवार, नागनाथ कुंडलवार, ज्ञानेश्वर इबितवार, अर्जुन नंदेवार,दीपक अनंतवार शंकर रायपलवार, मनोज अनंतवार,संजय पून्नलवार व इतर समाज बांधवांची उपस्थिती होती तसेच नवीन कौठा येथील जळबाजी सोनकांबळे,राहुल हैबते व इतर बराच मित्रपरिवार उपस्थित होते.